Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्याने त्यांना विनंती केली की, या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे म्हणजे बाबेलाच्या इतर ज्ञान्यांसोबत त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा घात होऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:18
22 Iomraidhean Croise  

कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.”


स्वर्गातील देवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.


हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”


ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.


त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवायला सांगितले; ह्याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान आपणाला झाले म्हणजे आपले राज्य निश्‍चयाने आपणास मिळेल.’


तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.”


मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.


तुम्हांला काय वाटते? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय?


मी आणखी तुम्हांला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल.


त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता.


बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा;


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan