Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे; मानवात वास न करणार्‍या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 2:11
25 Iomraidhean Croise  

मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.


सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.


देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


देव ह्या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यात तुझा समावेश होत नाही; तर हे जे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.


तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस; तू पाडाव केलेल्यांना कैद करून नेले आहेस; मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा, देवा, तू तेथे वास करावास.


आणि मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.


तेव्हा जादुगार फारोला म्हणाले, “ह्यात देवाचा हात आहे.” तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना.


तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


पाहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले ह्या आम्हांला सीयोननिवासी सेनाधीश परमेश्वराने इस्राएलात चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत.


मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो.


पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते;


त्यांचे पाडलेले रक्त मी निर्दोष ठरवीन, ते पूर्वी निर्दोष ठरवले नव्हते, कारण परमेश्वर सीयोनात वस्ती करतो.


ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”


येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील.


येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.


देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan