Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 12:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, ह्याचा परिणाम काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 12:8
9 Iomraidhean Croise  

आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.”


तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, त्याला त्यांतल्या एकाने विचारले, “ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे?”


तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”


तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.


तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्‍यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?”


त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.


प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले.


तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही.


त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या; त्यांत त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan