Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नेमलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल; दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करारमदार करण्यास जाईल; तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही; तर त्या स्त्रीला ज्यांनी आणले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरवले त्यांच्यासह तिला इतरांच्या स्वाधीन करण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:6
9 Iomraidhean Croise  

दुष्टांकडून त्यांचा प्रकाश काढून घेतला जाईल; त्यांचा उगारलेला हात मोडतो.


त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो.


“मानवपुत्रा, मिसरी राजा फारो ह्याचा भुज मी मोडला आहे; पाहा, त्याला पुन्हा तलवार धरण्याची शक्‍ती यावी म्हणून त्याला औषधोपचार करून पट्टी बांधायची ती कोणी बांधली नाही.


तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.


अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल; तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही; त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही; त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही.


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल; तो सैन्यासहवर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्यांच्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल.


कारण पाहा, मी देशात एक मेंढपाळ आणतो; तो मरण्याच्या लागास आलेल्यांकडे ढुंकून पाहणार नाही, भटकलेल्या मेंढरांना तो शोधणार नाही, मोडलेल्यांना बरे करणार नाही, धडधाकटांचे तो पालन करणार नाही; तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्यांच्या खुरांचे तुकडे-तुकडे करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan