Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 दक्षिणेचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:5
7 Iomraidhean Croise  

तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.


त्या काळात दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील; दृष्टान्त प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी आडदांड लोक उठतील, पण ते पडतील.


मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल तो उत्तेजित करील; दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील.


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्‍चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan