Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:45
29 Iomraidhean Croise  

उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.


ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.


जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन;


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.


मी तुला माघारी फिरवीन, तुला घेऊन जाईन, उत्तरेच्या अतिशय दूर प्रदेशातून तुला यायला लावीन. तुला इस्राएलाच्या पर्वतांकडे आणीन;


त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.


तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.


पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल.


तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.


पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील.


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या वाटांनी चालू.” कारण सीयोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील; अर्धे पूर्वसमुद्राकडे व अर्धे पश्‍चिमसमुद्राकडे वाहतील; उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल.


मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्‍यापर्यंत जावी.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जिवे मारील, त्याला ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.


त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरून पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढले; ‘तेव्हा [देवापासून] स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘खाऊन टाकले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan