Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 “अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्‍या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:40
24 Iomraidhean Croise  

समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांची धनुष्ये सज्ज केली आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारेसारखे, त्यांची चाके वावटळीसारखी आहेत.


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


मी तुला पळ काढायला लावीन; तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार ह्यांना बाहेर काढीन; सर्व जण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे;


तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील; तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझ्यासह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल.


तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.


तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.


तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.


त्या लोकांचे बळ त्याच्यापुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल; करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल.


मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल तो उत्तेजित करील; दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील.


सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.


एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांना पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल.


तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल; तो सैन्यासहवर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्यांच्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल.


हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.


तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.


तेव्हा मी उभा होतो तेथे तो माझ्याजवळ आला; तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो; तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हा दृष्टान्त समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”


त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’


आणि घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan