Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:4
24 Iomraidhean Croise  

खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही.


कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही; त्याला पुत्र किंवा बंधू नाही; तरी त्याच्या कष्टाला अंत नाही, व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, “मी हे श्रम करतो व माझ्या जिवाचे सुख दवडतो, हे कोणासाठी?” हेही व्यर्थ, कष्टमय होय.


तरी त्यांना उपटून टाकल्यावर मी त्यांच्यावर पुनरपि दया करीन, व त्यांच्यातल्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वतनात व जमिनीत परत आणीन.


पण ते माझे ऐकणार नाहीत तर असले राष्ट्र मी समूळ उपटून टाकीन; ते उपटून त्याचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.”


एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो;


प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्‍यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही.


तेव्हा तो मला म्हणाला, “वार्‍याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्‍याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्‍या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.”


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


ह्यानंतर मी पाहिले तर आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले; त्याच्या पाठीवर पक्ष्याचे चार पंख होते; त्या श्वापदाला चार शिरेही होती; त्याला अधिकार दिला होता.


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही.


तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूंना चार ठळक शिंगे फुटली.


अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.


येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.


परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’


ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan