Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:34
22 Iomraidhean Croise  

मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.


जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील.


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;


कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील,


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते.


कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.


आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुंसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan