Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:32
27 Iomraidhean Croise  

हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.


ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


खोटी साक्ष देणार्‍याला शिक्षा चुकणार नाही; लबाड बोलणारा सुटणार नाही.


लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.


ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan