Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील; ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील; पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही; कारण शेवट व्हायचा तो नेमलेल्या वेळीच होणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 हे दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:27
24 Iomraidhean Croise  

मग अबशालोम म्हणाला, “आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन ह्याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या.” राजाने त्याला विचारले, “त्याने तुझ्याबरोबर का यावे?”


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे.


नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


ते कुटिल युक्त्या शोधून काढतात; ते म्हणतात, “आपण चतुराईने युक्ती शोधून काढली आहे;” प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे,


वाईट योजणार्‍यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्‍यांच्या मनात हर्ष असतो.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय.


प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील काय? ती सुकून जावी म्हणून तिला मुळासकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत काय? तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल; तिची मुळे उपटून टाकायला मोठे सामर्थ्य आणि पुष्कळ लोक लागणार नाहीत.


पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले.


मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल; त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल.


नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.


सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


तेव्हा मी उभा होतो तेथे तो माझ्याजवळ आला; तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो; तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हा दृष्टान्त समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”


तो म्हणाला, “पाहा, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल हे मी तुला सांगतो; कारण नेमलेल्या अंतसमयासंबंधाने हा दृष्टान्त आहे.


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही.


त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”


बंधूंनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan