Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:23
11 Iomraidhean Croise  

आपली बहीण दीना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर ह्याला उत्तर दिले.


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


दुर्जन वेतन मिळवतो ते बेभरवशाचे असते; परंतु जो नीतीचे बीजारोपण करतो त्याचे वेतन खातरीचे असते.


त्या लोकांचे बळ त्याच्यापुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल; करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल.


लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील; तो लुटीचे धन लोकांना वाटून देईल; काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील.


त्याची सत्ता बलवत्तर होईल; तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही; तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल; तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan