Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्या लोकांचे बळ त्याच्यापुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल; करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि उचंबळणारी बळे त्याच्या समोरून ओसरून जातील, व मोडून खातील, आणि कराराचा अधिपतीही मोडून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:22
11 Iomraidhean Croise  

तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.


त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल.


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


ह्यामुळे भूमीचा थरकाप होणार नाही काय? तिच्यावर प्रत्येक रहिवासी शोक करणार नाही काय? तिला नील नदीप्रमाणे पूर्णपणे पूर येईल. मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती खळबळेल व पुन्हा ती ओसरेल.”


कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.


तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan