Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग त्याच्या जागी नकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:21
17 Iomraidhean Croise  

मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात.


अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत.


पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवील; पण थोड्याच दिवसांत त्याचा नाश होईल; तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही.


जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील.


ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.


तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल; तो सैन्यासहवर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्यांच्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल.


हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्रस्वरूपी, कूटप्रश्‍न समजणारा असा राजा उभा राहील.


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


त्यांतल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले; त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली.


परमेश्वराने तुझ्याबद्दल अशी आज्ञा केली आहे की, “तुझ्या बीजाची पुन्हा पेरणी होणार नाही; तुझ्या दैवतांच्या मंदिरातून कोरीव व ओतीव मूर्ती मी नष्ट करीन; मी तुझी कबर तयार करीन, कारण तू हलका ठरला आहेस.”


मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan