Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो आपल्या सार्‍या राज्याच्या बलासह येईल; तरी तो त्याच्याबरोबर करारमदार करील; तो त्यांना स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल; ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल. आणि तो उत्तरेच्या राजाशी करार करील तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भष्ट करण्यास देईल म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल पण त्याची योजना यशस्वी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:17
15 Iomraidhean Croise  

पुढे अरामाचा राजा हजाएल ह्याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरवला.


यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


जेव्हा पुष्कळांचा फडशा उडवण्यासाठी शत्रू मोर्चे लावतील व बुरूज बांधतील तेव्हा युद्धप्रसंगी फारोला मोठे सैन्य व बहुत लोक बरोबर घेऊन त्याची कुमक करता येणार नाही.


“मानवपुत्रा, अम्मोन वंशजांकडे आपले मुख करून त्यांच्याविषयी संदेश दे;


मग तू एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तू आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तू तिला वेढा घालणारा हो. हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल.


तू आपले तोंड व उघडा हात यरुशलेमेच्या वेढ्याच्या चित्राकडे रोखून धर व तिच्याविरुद्ध संदेश दे.


मग तो आपल्या देशातील दुर्गांकडे आपला मोर्चा फिरवील; पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही.


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.


जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.


जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.


पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्‍चयाने तिकडे आपले तोंड वळवले.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


Lean sinn:

Sanasan


Sanasan