दानीएल 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल; तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही; त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही; त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अशाप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल. Faic an caibideil |
नेमलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल; दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करारमदार करण्यास जाईल; तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही; तर त्या स्त्रीला ज्यांनी आणले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरवले त्यांच्यासह तिला इतरांच्या स्वाधीन करण्यात येईल.