Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 11:12
19 Iomraidhean Croise  

तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे; त्याविषयी फुशारकी मारत आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तर तू होऊन अरिष्टाला का आमंत्रण करत आहेस?”


तू म्हणतोस, ‘मी अदोमाचा मोड केला,’ त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारत आहेस; आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तू आपण होऊन अरिष्टास का आमंत्रण करत आहेस?”


तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.


पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याच्यावर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला.


गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.


तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली; मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्यापुढे तुला टाकले.


“मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, ‘मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे;’ पण तू देव नव्हेस, मानव आहेस; आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;


तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढवलेस; ह्या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे.


तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.


तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ.


त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan