Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग मी त्याची वाणी एकेली आणि ती ऐकत असता पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर मी त्याला बोलताना ऐकले आणि मी जमिनीवर पालथा पडलो आणि मला गाढ झोप लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:9
11 Iomraidhean Croise  

सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला.


मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली;


स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता,


रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही.


तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले.


तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले.


मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत तो मी आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan