Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याची त्वचा तेजस्वी होती, त्याचा चेहरा विजा चमकाव्यात तसा लखलखत होता. त्याचे डोळे अग्नीच्या ज्योतीसारखे होते. त्यांचे बाहू आणि पाय उज्ज्वल कास्यासारखे चमकत होते आणि त्याची वाणी फार मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखी प्रचंड होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:6
18 Iomraidhean Croise  

आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत.


त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.


ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत.


ती चाके व त्यांचा घाट ही वैडूर्य मण्यांसारखी दिसत होती; त्या चोहोंचा आकार एकच होता; त्यांचा आकार व घाट जणू काय चाकांत चाक असा होता.


ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.


त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते.


मी पाहिले तर प्रत्येक करूबाच्या बाजूस एक अशी सगळ्या करूबांच्या बाजूला चार चाके होती; ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती.


त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता.


मी पाहिले तेव्हा एक पुरुष असल्याचा भास मला झाला;1 त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कंबरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला.


तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.


आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले.


मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.


‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.


थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत,’ आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारखे’ आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो :


पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग अशा रत्नांचे ते होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan