Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो; त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मीखाएल ह्याशिवाय दुसर्‍या कोणाचे मला साहाय्य नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु सत्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते मी तुला प्रथम सांगतो. (तुमचा राजपुत्र मिखाएलाशिवाय त्यांच्याविरुद्ध माझी मदत करणारा कोणीही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:21
14 Iomraidhean Croise  

पारसाच्या राज्याचा अधिपती एकवीस दिवस मला आडवा आला; तेव्हा पाहा, मुख्य अधिपतींपैकी एक, मीखाएल, माझ्या साहाय्यास आला; व मी पारसाच्या राजांजवळ राहिलो.


“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.


हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.


हा जो अहोरात्रीचा3 दृष्टान्त सांगितला तो खरा आहे; हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे.”


त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.


हे जे त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’


आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला.


मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूत अजगराबरोबर ‘युद्ध करण्यास’ निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan