Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्‍या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा मानवासारख्या दिसणार्‍या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:18
16 Iomraidhean Croise  

पण मी तुम्हांला आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणार्‍या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते.


त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाही; तर त्याने माझी दाद घेतली असती.


मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.


तेव्हा पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो.


तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही.


मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टान्त पाहिला तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो तेव्हा पाहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी माझ्यासमोर उभे राहिलेले पाहिले.


तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.


परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”


तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.


तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे;


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे;


दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan