Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा कोणीतरी जो मानवासारखा दिसणाऱ्याने माझ्या ओठांना स्पर्श केला आणि मी माझे मुख उघडले आणि मी बोलू लागलो. जो माझ्यापुढे उभा होता त्याला म्हटले, “प्रभू या दृष्टान्तामुळे मी मनोवेदनांनी ग्रस्त झालो आहे; आणि माझ्यात काही बळ उरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:16
29 Iomraidhean Croise  

तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”


तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.”


कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.


तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.”


तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;


त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.


तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहचला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला होता; तो मनुष्य सकाळी माझ्याकडे येण्यापूर्वी देवाने माझे तोंड उघडले होते; माझे तोंड उघडल्यावर मी काही मुका नव्हतो.


मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”


मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्‍यांना लागू पडो!


मग मी दानीएल तर असा झालो की, माझ्या ठायी माझा जीव घाबरा झाला; माझ्या डोक्यात घोळणार्‍या दृष्टान्तांमुळे मी चिंताक्रांत झालो.


ह्या गोष्टींचे कथन येथे संपले. मी दानीएल ह्या कल्पनांनी व्याकूळ झालो, आणि माझी चर्या पालटली; तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले.


मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टान्त पाहिला तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो तेव्हा पाहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी माझ्यासमोर उभे राहिलेले पाहिले.


तेव्हा मी उभा होतो तेथे तो माझ्याजवळ आला; तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो; तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हा दृष्टान्त समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”


तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.


मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.


असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.


मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला.


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”


तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”


आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;


हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली, “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणार्‍या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हांला शिकवावे असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे.”


गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”


तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan