Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तो दूत मला म्हणाला, “दानीएला परमप्रिय पुरुषा मी जे सांगतो ते मन लावून समजून घे; आणि स्थिर रहा, तुला हे सांगण्यासाठी मला पाठवले आहे,” जेव्हा तो हे शब्द बोलला मी थरथरत उभा राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 10:11
15 Iomraidhean Croise  

हे ऐकून माझे हृदय थरथरून स्थानभ्रष्ट होते.


म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.


मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.


तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या नीतिमत्तेमुळे आपला तेवढा जीव वाचवतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याबरोबर बोलेन.”


तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.”


तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.


मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या; कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या.


तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता;


मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे?” असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले.


तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.


तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan