Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने नबुखद्रेनेस्सर राजास यहूदाचा राजा यहोयाकीमवर विजय दिला आणि त्यास परमेश्वराच्या घरातील काही वस्तू दिल्या त्याने त्या शिनार येथे त्याच्या देवाच्या घरासाठी आणल्या आणि त्या पवित्र वस्तू त्याने त्याच्या देवाच्या भांडारात ठेवल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 1:2
30 Iomraidhean Croise  

शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.


पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले, आणि तेथे त्यांनी वस्ती केली.


यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले.


यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.


नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली.


नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुशलेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेवली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश ह्याने बाहेर काढली.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्राएलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे नियमशास्त्र ते ऐकेनात;


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


तसेच मी याजकांना व सर्व लोकांना म्हणालो : “परमेश्वर म्हणतो, जे तुमचे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘पाहा, परमेश्वराच्या मंदिराची पात्रे लवकरच बाबेलहून परत आणण्यात येतील’ त्यांचे हे बोलणे ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन.


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, ‘खास्द्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य ह्यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ.’ म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत.”


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय?


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.


तो मला म्हणाला, “शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती एफा ते नेत आहेत; ते तयार झाले म्हणजे ती तेथे तिच्या स्थानी स्थापतील.”


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan