Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




दानीएल 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




दानीएल 1:19
11 Iomraidhean Croise  

मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला.


एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.


नबुखद्नेस्सर राजाने त्यांना आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले.


अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.


राजा खात असे त्या मिष्टान्नांतून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन व्हावे; ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे, अशी राजाने आज्ञा केली.


ह्या तरुण मंडळीत यहूदा वंशातले दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या हे होते.


खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.


ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले.


ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan