Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 4:8
16 Iomraidhean Croise  

सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो.


ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.


तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.


मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय?


म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा.


आमची खुशाली तुम्हांला कळावी व त्याने तुमच्या अंत:करणाचे समाधान करावे ह्याकरताच मी त्याला तुमच्याकडे पाठवले आहे.


म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे; ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी; व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की,


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.


म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात.


बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.


तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan