Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तुमचे बोलणे सर्वदा सभ्य व मिठाने रुचकर केलेले असावे व प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजून घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 4:6
33 Iomraidhean Croise  

राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.


त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.


मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.


मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.


मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे.


अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.


नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.


जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते.


ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते.


शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.


तू ते परमेश्वरासमोर आण; मग याजक त्यांच्यावर मीठ टाकतील व त्यांचे हवन करून ते परमेश्वरास अर्पण करतील.


तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस; तुझ्या सर्व अर्पणांसह मीठसुद्धा अर्पावे.


तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.


मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”


तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्‍चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?”


तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.


तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.


ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;


तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan