Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 युस्त म्हटलेला येशू तुम्हांला सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्या द्वारे माझे सांत्वन झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 4:11
16 Iomraidhean Croise  

मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्‍या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्‍चर्य वाटले.


मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की,


ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा;


आणि त्याने सुंता झालेल्या लोकांचाही बाप व्हावे, पण केवळ ते सुंता झालेले आहेत म्हणून नव्हे तर आपला पिता अब्राहाम सुंता न झालेला असता त्याचा जो विश्वास होता, त्यालाही अनुसरून चालतात म्हणून त्यांचा बाप व्हावे.


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता;


आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील.


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले;


कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत;


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला : तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला;


आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan