Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे आणि तुम्हांला ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये खंबीर स्थैर्याने एकत्र उभे असलेले पाहून मला आनंद होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:5
19 Iomraidhean Croise  

होमबली पुष्कळ होते आणि शांत्यर्पणांच्या पशूंची चरबीही पुष्कळ होती; प्रत्येक होमबलीबरोबर त्यांनी पेयार्पणेही दिली. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना व्यवस्थितपणे स्थापण्यात आली.


कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही.


आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”


ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.


पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो.


कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.


सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.


कारण तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.


बंधुजनहो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला विरहदुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;


कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असलात तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल.


कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.


ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे.


त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत.


आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्‍चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan