Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यांवरून ज्ञान म्हणतात खरे; तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 जी दिखाऊ सुज्ञता बळजबरीने केलेली देवदूतांची उपासना, खोटी नम्रता व देहदंडन यांच्यामधून व्यक्त होते त्या सुज्ञतेवर असे नियम आधारित असतात. परंतु देहस्वभावाच्या वासनेला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यांच्यात नसते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 खरोखर या नियमांना ज्ञानाचा देखावा आहे, स्वनियमाने नेमलेली उपासना, खोटी नम्रता आणि देहाला कठोर कष्ट देणे या गोष्टी आहेत. परंतु दैहिक वासना नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचा काडी इतकाही उपयोग होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:23
10 Iomraidhean Croise  

तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो.


लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.


ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या;


लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील.


कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan