Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 शरीराचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताला त्याने सोडून दिलेले असते. ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सर्व शरीर सांधे व मज्जा यांच्यायोगे दृढ जोडले जाते व त्याची ईश्वरी इच्छेनुसार वाढ होत जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:19
33 Iomraidhean Croise  

म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]


ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.


तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.


आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.


मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.


त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले;


हीच त्याचे शरीर; जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.1


त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते;


आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.


कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो.


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी.


तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे; ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी; व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;


आणि अखिल मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी,


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे, आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे.


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा.


आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan