Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 आपल्याविरुद्ध असलेली ऋणपत्रिका त्याने खोडली व त्याच्या क्रुसावर चढवून त्याने ती पूर्णपणे रद्द केली

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:14
21 Iomraidhean Croise  

त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्‍यांसमोर तुला संताप आणला आहे.


तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती.


तुम्हांला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहूद्यांविषयी लिहा, आणि पत्रावर राजाची मोहर करा; राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यांवर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही.”


हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.


माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


अशी वाणी झाली की, “भर घाला, भर घाला, मार्ग तयार करा; माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका.”


मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते त्या कटू जलात धुवावेत;


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;


तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता?


कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.


पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे,


त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan