Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 कारण तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी मला प्रत्यक्ष पाहिले नाही, त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम करीत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तुमच्यासाठी आणि लावदिकीया रहिवाशांसाठी, आणि ज्या सर्वांशी माझी वैयक्तिक भेट झाली नाही अशांसाठी, मी किती झटून श्रम करीत आहे हे तुम्हाला समजावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:1
18 Iomraidhean Croise  

तेव्हा राहेल म्हणाली, “मी आपल्या बहिणीशी प्रचंड झोंबी करून यश मिळवले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘नफताली’ ठेवले.


मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.


आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.


‘माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही,’ असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दु:ख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.


माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.


मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीही करत आहात.


तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;


ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे.


तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan