Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्‍या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 कलस्सै येथील पवित्र लोकांना म्हणजे ख्रिस्तामधील श्रद्धावंत बंधुजनांना देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित झालेला पौल व बंधू तीमथ्य यांच्याकडून,

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 1:1
11 Iomraidhean Croise  

मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.


पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :


करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्‍या सर्वांना,


करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :


फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :


देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून :


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला : तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला;


आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan