Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी मंदिरांतील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील; सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर फेकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 8:3
21 Iomraidhean Croise  

मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत.


सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.


शेतकर्‍यांनो, निराश व्हा; द्राक्षीचे मळे करणार्‍यांनो, गहू व जवस ह्यांकरता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे.


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणार्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


ह्यास्तव परमेश्वर, सेनाधीश देव, प्रभू म्हणतो, “प्रत्येक चव्हाठ्यावर शोक होईल, गल्ल्यागल्ल्यांतून लोक हायहाय म्हणतील, ते शोक करण्यास शेतकर्‍यांना बोलावतील व विलापगीत म्हणण्यात जे चतुर त्यांना आक्रंदन करण्यास बोलावतील.


तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही.


तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता; कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता.


तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता; दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता.


प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


घोडेस्वारांची दौड, तलवारींची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे; वधलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे; मढ्यांचा हिशेबच नाही; लोक त्यांच्या मढ्यांवर ठोकर खातात.


प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan