Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 प्रभू परमेश्वराने आपल्या पवित्रतेची शपथ वाहून म्हटले, “पाहा, असे दिवस तुम्हांला येत आहेत की तुम्हांला आकड्यांनी ओढून नेतील; शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पाहा, ते तुम्हास आकड्यांनी, आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील, असे दिवस तुम्हावर येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे: “खचितच अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 4:2
11 Iomraidhean Croise  

एकवार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की, मी दाविदाला कदापि दगा देणार नाही;


त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील;


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.


मी तुझ्या जाभाडात गळ टोचीन, मी तुझ्या नद्यांतले मासे तुझ्या खवल्यांना चिकटवीन, मी तुला तुझ्या खवल्यांना चिकटलेल्या नद्यांतल्या माशांसह तुझ्या नद्यांमधून बाहेर खेचून काढीन.


मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.


मी तुला पळ काढायला लावीन; तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार ह्यांना बाहेर काढीन; सर्व जण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे;


प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.”


परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की, “मी त्यांची कोणतीही कर्मे खातरीने कधीही विसरणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan