Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पण मी हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन; तो बेन-हदाद ह्याचे महाल जाळून भस्म करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी हजाएलच्या घरात अग्नी पाठवीन; आणि तो अग्नी बेन-हदादच्या राजवाड्यांना गिळून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेन व बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 1:4
20 Iomraidhean Croise  

परमेश्वर त्याला म्हणाला, “तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा, तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलाला अभिषेक करून अरामावर राजा नेम.


बेन-हदाद बिन हजाएल ह्याने यहोआहाज ह्याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश ह्याने परत घेतली. योवाशाने त्याला तीनदा मार देऊन इस्राएली नगरे परत घेतली.


ह्यास्तव इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यांना यहोआहाज हयात होता तोपर्यंत अरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद ह्यांच्या स्वाधीन केले.


त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला.


परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद ह्याच्याकडे पाठवली; आणि त्याला असे सांगून पाठवले की


पण तुम्ही शब्बाथ पवित्रपणे पाळावा, शब्बाथ दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशींतून येजा करू नये, ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्या वेशींत मी अग्नी पेटवीन; तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही.”’


मी दिमिष्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन, तो बेन-हदादाचे वाडे खाऊन टाकील.”


मी मिसरास आग लावीन व त्याचे सर्व साहाय्यकर्ते नष्ट होतील, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.


मी मागोगात व द्वीपांत निर्भय राहणार्‍या लोकांत अग्नी पाठवीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.


तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील.”


ह्यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्राचे महाल जाळून भस्म करील.”


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील.


त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;


त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.”


त्याप्रमाणेच शखेमकरांच्या सर्व दुष्टाईचे खापर देवाने त्याच्याच माथ्यावर फोडले आणि यरुब्बालाचा मुलगा योथाम ह्याने त्यांना दिलेला शाप खरा ठरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan