Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




आमोस 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तकोवा येथील एक मेंढपाळ आमोसाची वचने—त्याने उज्जीयाह यहूदाहचा आणि योआश चा पुत्र यरोबोअम इस्राएलचा राजा असता, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाबद्दल जे दृष्टान्तामध्ये पाहिले ते हे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




आमोस 1:1
23 Iomraidhean Croise  

तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन;


तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलीशा भेटला; तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरत असे, आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलीयाने आपला झगा त्याच्यावर टाकला.


मग सर्व यहूदी लोकांनी सोळा वर्षांच्या अजर्‍यास1 त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले.


यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला; त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.


बेथलेहेम, एटाम, तकोवा,


ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


तू ही सर्व वचने त्यांना सांगशील तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत.


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे.


यहूदाचे राजे योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या कारकिर्दित मीखा मोरष्टी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले; शोमरोन व यरुशलेम ह्यांविषयी त्याने जे पाहिले ते हे :


तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्‍याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.


नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते.


तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan