Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 9:6
33 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल.


हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


परमेश्वर म्हणतो, “ह्या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत; म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत; पण जो दीन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याच्याकडे मी पाहतो.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू आपल्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याबरोबर बोलेन.”


तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्‍यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.”


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल.


तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारीत, “तर मग आम्ही काय करावे?”


ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”


तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या काठी कातडे कमावणार्‍या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.’ [तो आल्यावर तुझ्याशी बोलेल].


तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्‍यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”


हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”


मग मी म्हणालो, ‘प्रभूजी, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.’


तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.


तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.


आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो; जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.”


कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.


शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.


मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.


म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;


तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


मग यज्ञासाठी येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन; मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर.”


पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan