Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 9:2
23 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील,


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.


ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.


मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.


तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो;


फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”


आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली.


हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.


तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यांतील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले.


तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’.


आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.”


तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, “हे नाव घेणार्‍यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकांकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना?”


दिमिष्कात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकार्‍याने मला धरण्याकरता दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता.


आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan