Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 प्रभू त्याला म्हणाला, “उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करत आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 प्रभू हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्त्यावर जा, तेथे यहूदाचे घर शोध व तार्सस शहराहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तीबद्दल विचार सध्या तो तेथे आहे; व प्रार्थना करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 9:11
28 Iomraidhean Croise  

आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”


त्याने आम्हांला सांगितले की, ‘मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण;


नंतर तो शौलाचा शोध करण्यास तार्सास गेला.


तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’


तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.”


“मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.


तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्‍चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.


इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”


बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले.


पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan