Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 8:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 इकडे फिलिप्प अजोत नगरात आढळला आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 इकडे फिलिपच्या लक्षात आले की, आपण अजोत नगरात आहोत. पुढे कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने शुभवर्तमान घोषित केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 8:40
21 Iomraidhean Croise  

अश्दोदात जारज (मिश्रवंशीय) वस्ती करतील व मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन.


कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


तिसर्‍या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता.


इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.


हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्‍यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला.


मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला.


आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो.


मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.


मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा;


कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.


मग फेस्त सुभ्यात आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरुशलेमेस गेला.


मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.


फेस्ताने उत्तर दिले, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे;


मग तो त्यांच्यामध्ये आठ-दहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला; आणि दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला.


नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.


बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले.


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


पलिष्ट्यांनी देवाचा कोश घेतला तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan