Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 काही भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले, त्यांनी त्याच्यासाठी फार शोक केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 8:2
19 Iomraidhean Croise  

सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.


त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला.


मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला.


हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीद वंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर ह्यांनी त्याच्यासंबंधाने आदर व्यक्‍त केला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.


यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्‍यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही.


ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत.


अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्‍या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.


हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.


तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.


तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.


त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते.


शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदीया व शोमरोन ह्या प्रदेशांत पांगापांग झाली.


इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे.


इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला; मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले.


शमुवेल मृत्यू पावला होता; सर्व इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्याला मूठमाती दिली होती. शौलाने दैवज्ञ व मांत्रिक ह्यांना देशातून घालवून दिले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan