Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला; आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 स्वतः शिमोननेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्हे व मोठे चमत्कार पाहून तो स्वतः आश्चर्यचकित झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 8:13
16 Iomraidhean Croise  

राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्‍चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.


त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.


आणि विश्वास धरणार्‍यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील,


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.


येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्‍चर्य करता.


पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले.


देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले;


आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्‍चर्य व विस्मय वाटला.


ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan