Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

60 मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

60 त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

60 आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:60
23 Iomraidhean Croise  

उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो,


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.


थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;


मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली,


तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’


जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”


कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला;


असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली.


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.


तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच.


आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे.


तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे.


पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;


त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.


प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.


माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते; ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो.


“त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan