Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 म्हणून देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील ताऱ्यांची पूजा करावयास सोडून दिले, ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे: हे इस्राएलच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात पशू कापून मला यज्ञात अर्पण केले काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे: “ ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:42
26 Iomraidhean Croise  

त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.


चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;”


तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”


ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.


तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या आतल्या अंगणात नेले, तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम परमेश्वराच्या मंदिराकडे पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते.


एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या.


संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.


म्हणून सावध राहा, नाहीतर संदेष्ट्याच्या ग्रंथात जे सांगितलेले आहे ते तुमच्यावर येईल :


‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.


म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले,


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’


तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan