Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:39
15 Iomraidhean Croise  

एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.


त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला.


इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”


पण तेथे लोकांना खूप तहान लागली आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, “आम्हांला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस?”


मिसर देशात आम्हांला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते;


ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”


तेव्हा ‘जो आपल्या शेजार्‍यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?


संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.


गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले; हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, “तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan