Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 ‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:36
38 Iomraidhean Croise  

फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला; मी म्हणालो, “हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत; ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत;”


मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;


चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


इस्राएल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहचेपर्यंत चाळीस वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहचेपर्यंत ते मान्ना खात होते.


मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल;


मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा; व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा.


त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.”


पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.


तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय?


ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत.


तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.


तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’


मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan