Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग दुसर्‍या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 दुसर्‍या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:26
12 Iomraidhean Croise  

अब्राम लोटाला म्हणाला, “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत.


ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.”


पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!


दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.


नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले.


तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.


ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत,


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan