Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 7:23
18 Iomraidhean Croise  

आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :


तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.


यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य!


नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले.


जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली.


मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”


मोशे व अहरोन ह्यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता. अहरोनाची काठी


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.”


तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्‍याला मारून’ त्याचा सूड उगवला.


तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्‍या देवाची स्तुती असो.


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan